संजय निंबाळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
नागपूर,: ( दि. ६ जलैं २०२३ ) डाॅ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभागीय अध्यक्ष तसेच गरीब होतकरू लोकांच्या सुख दुःखात धावून जाणारे कर्मट निस्वार्थी व्यक्तीमहत्व असणारे संजय निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
डाॅ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तसेच मित्र परिवारातर्फे गुरुवारी ५ जुलै रोजी सरस्वती नगर, विश्वकर्मा मंदिर वाटोळा येथील डाॅ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या विभागीय कार्यालयात संजय निंबाळकर यांचा अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
टायगर आटो चालक संघाचे अध्यक्ष विलास भालेकर, डाॅ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शांताराम जळते, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष प्रमोद वैद्य, विनायकराव इंगळे, बाळबूदे, देवाजी भूजाडे यांच्यासह असंख्य शिक्षक, मित्र परिवार व चाहते मंडळी मोठया संख्येनी उपस्थित होते.. त्यांनी संजय निंबाळकर यांचे अभीष्टचिंतन केले.
सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी निंबाळकरांच्या निवासस्थानी दिवसभर नागरिकांची रिघ लागली होती. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती. ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात शेला घालून त्यांचा सत्कार करून संजय निंबाळकर आशीर्वाद घेत होते.