मध्य भारतातील सर्वात मोठे लोकप्रिय कृषी प्रदर्शन अँग्रोव्हिजन २४ नोव्हेंबर पासून नागपूरात
नागपूर : ( २७ ऑक्टोंबर २०२३ ) विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम ठरत असलेले मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन, अँग्रोव्हिजन येत्या २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पीडीकेव्ही ग्राउंड, दाभा, नागपूर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली १४ वर्षांपूर्वी अग्रोव्हिजनच्या आयोजनास सुरवात झाली. अल्पावधीतच हे मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन बनले आहे. कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे केंद्रस्थान ठरणाऱ्या कार्यशाळा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषी विषयक ताज्या विषयांवरील कार्यशाळा, विदर्भाच्या शेती उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या परिषदांसोबतच टेक्नॉलॉजी इनोव्हेशनसाठी तसेच एमएसएमइ व पशुधन ही विशेष दालने या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये राहणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
★ शेतकऱ्यांना शिक्षीत व प्रोत्साहीत करणाऱ्या अॅग्रोव्हिजनच्या कार्यशाळा
अॅग्रोव्हिजन सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी निःशुल्क कार्यशाळांचे आयोजन करीत आहे. अॅग्रोव्हिजनचे प्रमुख आकर्षण असलेल्या कार्यशाळामध्ये उत्पादन तंत्रज्ञान, नव्या शेतीपद्धती, जोडधंदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बाजार सुविधा, पशुधन व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांविषयी भर देण्यात येणार आहे. शेती सुकर व्हावी आणि मुख्य म्हणजे शेतकन्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यावर्षी अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीने निवडलेल्या ३० पेक्षा जास्त विषयांवर कार्यशाळा होणार आहेत. देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथांपासून प्रेरणा घेण्याची संधी यातून शेतकऱ्यांना मिळेल. शेतकन्यांसाठी उपयुक्त अशा अनेक विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. यातील काही कार्यशाळा या जास्त कालावधीच्या असतील.
हळद आणि आले लागवड व प्रक्रिया, संत्रा आणि केळीचे निर्यातक्षम उत्पादन, उस लागवड तंत्रज्ञान शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, बे- हंगामी आणि निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन, भाजीपाला बियाणे उत्पादन, कापसाचे जास्तीतजास्त उत्पादनाचे नवे तंत्रज्ञान, रंगीत कापूस, सर्जीकल कापूस, जवस आणि करडई चे उत्पादन व मुल्यवर्धन, तेलबिया उत्पादन, कृषी वित्त, हरीतगृह तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्स, व्हर्टीकल फार्मींग, जलसमृद्धीतून ग्रामसमृद्धी आकांक्षित वाशीम जिल्हा पॅटर्न, सुक्ष्म सिंचन, जलयुक्त शिवार, गट शेती, सेंद्रिय शेती, शेतीमध्ये यांत्रिकीकरण, कृषी रसायनांचा योग्य वापर, कृषी पर्यटनतसेच शेतीमध्ये कृत्रीम बुद्धिमत्तेचा (AI) वापर, शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञान, हवामान अंदाजाचे महत्व असे अनेक विषयांवर या कार्यशाळेतून मार्गदर्शन केले जाईल.
★एकदिवसीय परिषदा
यंदा अॅग्रोव्हिजनमध्ये एकूण ३ परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भात डेअरी उद्योगाच्या संधी, विदर्भात गोड्यापाण्यातील मत्स्यव्यवसाय संधी, अन्न प्रक्रिया मध्यभारतातील संधी आणि आव्हाने या विषयांवर परिषदा होणार आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक बदलांचा पाया घालण्यासाठी या परिषदांचे आयोजन होणार आहे. राज्यकर्ते, धोरणकर्ते, प्रगतशील शेतकरी, व संबंधीत सर्वच जण यात सहभागी होणार आहेत.
★एकदिवसीय परिषदा
यंदा अॅग्रोव्हिजनमध्ये एकूण ३ परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भात डेअरी उद्योगाच्या संधी, विदर्भात गोड्यापाण्यातील मत्स्यव्यवसाय संधी, अन्न प्रक्रिया मध्यभारतातील संधी आणि आव्हाने या विषयांवर परिषदा होणार आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक बदलांचा पाया घालण्यासाठी या परिषदांचे आयोजन होणार आहे. राज्यकर्ते, धोरणकर्ते, प्रगतशील शेतकरी, व संबंधीत सर्वच जण यात सहभागी होणार आहेत.
★भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शन
मध्यभारतातील सर्वात मोठे आणि लौकिक असलेले अॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन यंदा अधिक व्यापक स्वरूपात सादर होणार आहे. भारतातील शेतीविषयक उत्पादने तयार करणाऱ्या अनेक मोठया कंपन्या, संशोधन संस्था, शासकीय विभाग, विविध राज्ये व कृषी विद्यापीठे प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान सादर करणार आहेत. सोबतच देशात कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन व सेवा विषय संस्था, या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. यामध्ये फवारणीची अत्याधुनिक उपकरणे, मजूर समस्येवर मात करण्यासाठीची. महत्वपूर्ण संत्रा व इतर फळपिकांसाठीची यंत्रे, काढणीपश्चात तंत्रज्ञान, स्वयंचलीत यंत्रणांचा समावेश आहे. याशिवाय MSME
NSIC अंतर्गत उद्योगांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय शेतकरी बांधवाच्या आवडीचे पशुधन दालनही असणार आहे.