उत्तर नागपूरात रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
★ केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजन
नागपूर: (दि २१ मे २०२३ ) केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने उत्तर नागपूरात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात परिसरातील शेकडो रक्तदान दात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा उत्तर नागपूरच्या वतीने मोर्चाचे उत्तर नागपूरचे अध्यक्ष संजय भगत यांच्या मार्गदर्शनाखाली केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने इंदोरा चौकातील निंबूनाताई तिडपुडे हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष संजय चौधरी, अशोक मेंढे, दिलीप गौर, मार्टिन मोरेश, आनंद अंबादे, मिना खोब्रागडे, अस्मिता गौर, सविता नारनवरे, आनिता खांबाळकर, दिपीका जांभूळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येनी उपस्थित होते.