सावी ( सोनी ) वासनिक यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ जाहिर
★ पुरस्कार १ में रोजी श्री तीर्थ क्षेत्र शिर्डी येथे करण्यात येणार प्रदान
नागपूर : अ दर्जाचे तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे साई बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा शिर्डीत ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने. साई च्या नावाने दिला जाणारा मानाचा, सन्मानाचा, भव्य व दिव्य असा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ नागपूर च्या मॉडेल क्षेत्रातील अतिशय नामांकित सावी ( सोनी) वासनिक यांना जाहिर झाला आहे.
त्यांना हा पुरस्कार १ में रोजी सांयकांळी ६ वाजता श्री तीर्थ क्षेत्र शिर्डी येथे होणाऱ्या साई कलारत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात लोणी येथील सुपुत्र समाजभूष उत्तम काका घोगरे पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी सुदाम संसारे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता काळुराम ढोब उपाध्यक्षा. सौ. वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम, सल्लागार, श्री.डॉ. अजय वारुळे. सर सचिव सिमा सपकाळ. मॅडम, कार्याध्यक्ष. राज भालेराव सर. प्रसिद्धी प्रमुख व या सोहळ्याचे भव्य व दिव्य आकर्षण (सोनी)सावी वासनिक मॅडम. तसेच या पुरस्कार सोहळा समितीतील सदस्य श्री. राजेंद्र पोळ सर, चंद्रकांत लोंढे. सर, राजुभाई शेख सर, विद्या ठाकुर मॅडम, डॉ. विदयाश्री मांडवकर मॅडम, विदया लंगडे. मॅडम, तेजस्विनी पायगुडे. मॅडम, मंगला विरशिद मॅडम, श्री.संजय ढाकरके. सर. श्री. मयुर शिंदे. सर, राजु मोरे सर, आशिष खांडविकर सर, लावणी सम्राज्ञी कु. अनुश्री खांडेकर मॅडम, शुभम पौणिकर सर, सुरज जाधव सर., अभिनेत्री. रेणूका शहाणे. मॅडम, रिया पाटील मॅडम, आणि श्रीमेसवाल मॅडम तानाजी दुगधे आणि दैनिक, महाराष्ट्र भूषण न्यूज चे संपादक, उपस्थित राहणार आहेत.