दि. बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया" या संघटनेला वाढविण्यासाठी युवक, युवतीने पुढं याव ; डाॅ. राजरत्न आंबेडकर
◆ डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे गोधनी रेल्वे जवळील धम्मोदय बौध्द विहारात जोरदार स्वागत
नागपूर : ( दि. २० फेब्रुवारी २०२४ ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संस्था " दि. बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया" हिचा ही विस्तार आम्ही पूर्ण भारत भर करीत आहोत, ही संस्था नव्याने उभ करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याकरीता गोधनी परिसरातील जे युवक, युवती, बौद्ध उपासक, उपासिका तयार असतील, ही बाबासाहेबांची संस्था जी बाबासाहेबांनी जगातून निर्माण करुन भारतात आणली. भारतातून निर्माण करून जगात नाही नेली. दि. वल्ड बुध्दीस्ट १९५४ च्या कान्फरन्स मध्ये बाबासाहेबांनी जवळपास ५४ जगामध्ये भाषण दिल्या नंतर बौद्ध धम्माची चळवळ कशी उभी करावी, भारतामध्ये हे सांगितल्या नंतर बाबासाहेबांनी ही संस्था उभी केली.
जागतीक पातळीची ही संघटना असून आज ही रसातळाला चाललेली असून यात युवक युवतीचा भरणा होत नसून या संघटनेला वाढ़विण्यासाठी गोधनीतील युवक युवतीनी पुढ याव असे आवहान भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी रविवारी गोधनी रेल्वे जवळील धम्मोदय बौद्ध विहारात प्रथम आगमना प्रसंगी केले.
यावेळी धम्मोदय बौद्ध विहार कमेटी तर्फ डॉ. राजरत्न आंबेड़कर यांचे पुष्प वर्षाव करुन व पुष्प गुच्छ देवून जंगी स्वागत करुन बुध्द वंदना घेण्यात आली. तसेच विहार कमेटी तर्फ गोधनी ग्राम चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीपजी वाघमारे यांच्या हस्ते १० हजार रुपयांचे धम्मदान देण्यात आले.
यावेळी दिलीपजी वाघमारे, राजू कोलते, रत्नाकर वाळके, विजयपाल आवळे, मोरध्वज अढाऊ, चंद्रकांत वाघमारे, विजय गजभिये, प्रेमदास चंहादे, दिलीप सोनटक्के, दिगांबर डोंगरे, ईश्वर सरोदे, विजया चंद्रीकापुरे, प्रतिक्षा कोलते, विद्या झारे, प्रियंका लोखंडे, सुनंदा गजभिये यांच्यासह बौध्द उपासक, उपासिका, युवक, युवती मोठ्या संख्येनी उपस्थित होते.