अंबाझरी डॉ आंबेडकर भवना करिता ओबीसी,मराठा समाज पण पुढे येणार हा संकल्प. राजु पांजरे
नागपूर ( दि.१९ फेब्रुवारी २०२३ )
ज्या भिम शक्ती ने फुले, शाहू शिवाजी यांना आपल्या देवाऱ्यात जागा देऊन शिवाजी, फुले, शाहू यांना पुज्यनीय केले त्या संविधान निर्मात्यांच्या अस्मितेचा प्रश्नांसाठी आता ओबीसी, मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मागे पुढे न पाहता आंदोलनात सहभागी होऊन अंबाझरी उद्यान डॉ . आंबेडकर भवनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिव शक्ती कामी लावावी असे आवाहन ओबीसी नेते राजू दादा पांजरे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाल परिसरातील त्यांच्या पुतळ्याजवळ नागपूर शहराचे खासदार नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यासाठी शिव शक्ती भिम शक्ती मतदान ऐक्य अभियान प्रसंगी बोलत होते. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुर्व नागपूर अंबाझरी उद्यान डॉ आंबेडकर भवन जल्दि बनाव अभियान प्रारंभ केला.
कार्यक्रमात मोर्चा चे पुर्व नागपूर अध्यक्ष रामभाऊ वाहणे, सचिन नगराळे, प्रविण आवळे, हंसराज उरकुडे, चरणदास गायकवाड, अँड मिलिंद खोब्रागडे, डॉ सुधा जनबंधू, सुनिता चांदेकर, गोलीबार चौक जीजाऊ महिला मंडळ च्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर अभियान संपूर्ण पुर्व नागपूरात राबविण्यात येणार आहे असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रकाश कांबळे यांनी कळविले.