महाविकास आघाडीच्या वतीने माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज
★ महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली
हिंगणा ( दि. २९ ऑक्टोंबर २०२४ ) विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी हजारो कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींच्या साक्षीने हिंगणा विधानसभा क्षेत्राचा महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत हिंगणा विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सुटल्यानंतर येथून माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बंग यांनी महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर मित्र पक्षांच्या हजारोंच्या संख्येने उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यां सह हिंगणा विधानसभा क्षेत्राचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत रविदास महाराज, भोलाशहा दर्गा आदी ठिकाणी अभिवादन करून रॅली काढत हिंगणा तहसील कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनीताताई गावंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मुजीब पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टाकसांडे, राजू राऊत, जिल्हा परिषदेचे माजी सत्ता पक्ष नेते बाबा आष्टनकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते दिनेश बंग, जि प सदस्य ममता थोपटे, माजी शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रश्मी कोटगुले, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली टालाटुले, तालुकाध्यक्ष योगेश सातपुते, वाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, नौशाद सिद्दिकी, पप्पूजी जयस्वाल, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, श्याम मंडपे, सुरेंद्र मोरे, वसंतराव ईखणकर,हेमराज डाखळे, माजी उपसभापती संजय चिकटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद उमरेडकर, तालुकाध्यक्ष प्रवीण कुंटे, पंचायत समिती उपसभापती पोर्णिमा दीक्षित, सदस्य सुनील बोंदाडे, वैशाली काचोरे युवक तालुकाध्यक्ष रोशन खाडे, मुकेश ढोमणे, सुधाकर धामंदे, हनुमंत दुधबळे, प्रमोद बंग, राजू दुधबळे, गुणवंता चामाटे प्रवीण घोडे , विशाखा लोणारे, मेघा भगत,दादाराव इटणकर, इनायतुल्ला शेटे, विठ्ठल कोहाड, उमेश राजपूत, प्रदीप कोटगुले, बालू सवाने, संकेत दीक्षित, पुरुषोत्तम डाखळे, गोवर्धन प्रधान, नारायण डाखळे, शुभम जोध, सोमेश ससाने, नीरज पयासी, चंदन वर्मा, विलास भागवत, ज्योती पारस्कर, लीलाधर दाभे, सुशील दीक्षित मीनाताई मेश्राम, श्याम फलके, मामा हुलके, संदीप नेहारे, गुलाबचंद हरीणखेडे, रज्जूबाई सोनोने, राहुल पांडे, राजू हाडपे, शैलेश रॉय,सुरजलाल बोपचे, युवराज पुंड, सिराज शेटे, वाहिद शेख, प्रभाकर वैध्यें, विलास वाघ,अनुप डाखळे, स्वप्नील लरोकर, सौरभ बंग,विजय कठाने, राम बंग, आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.