शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रेखा कृपाले
नागपूर: ( २१ ऑगस्ट २०२३ ) नागपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी रेखा ताई कृपाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी दुपारी माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांचे निवासस्थानी आयोजित कृपाले यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता प्रविण कुंटे पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब , माजी महिला शहर अध्यक्षा नूतनताई रेवतकर, ज्योती लिंगायत , राजा बेग, संगीता खोब्रागडे, प्रमिला टेम्भेकर , बबिता सोमकूवर, सुकेशनी नारनवरे ,मनीषा साहू, राणी डोंगरे, सोनी मंडल, कल्पना शिर्के, शोभा येवले , साधना श्रीवास्तव, लता क्षीरसागर, लता गोडघाटे, मंजू गोडघाटे, अंजीरा मानवटकर, पुष्पा डोंगरे, सुनीता खत्री, संगीता अंभोरे , प्रेमलता वानखेडे, गुर्जित कौर ,सरोज नाने, कल्पना यादव ,आराध्या माजू, माधवी करोटे, बबिता बडगे , मेहजबिन सैयद , हेमा वर्मा , कनिजा फातिमा , रुखसार शेख , शहनाज परवीन यांच्यासह असंख्य महिला व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी रेखा कृपाले यांनी शहरातील महिलांचे प्रश्न पक्षसंघटनेच्या बळावर सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.