गडचिरोलीत रूग्णवाहिका न मिळाल्याने बालकाचा मृत्यू*
गडचिरोलीत आरोग्य विभागाचे धिंडवडे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*
मुंबई; ( दि.२९ जुन २०२४ ) गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कोरोली या गावातील आर्यन अंकित तलांडी या चार वर्षाच्या बाळाला रूग्णवाहिका न मिळाल्याने उपचारासाठी वेळेत रूग्णालयात पोहचविता आले नाही. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
वेळेत रूग्णवाहिका मिळाली असती तर मुलाचा जीव वाचला असता. या घटनेची माहिती घेतली असता. गडचिरोलीत आरोग्य विभागाची 70 टक्के पदे रिक्त आहेत अशी माहिती मिळाली. ही पदे रिक्त असल्याने डॉक्टर उपस्थित राहत नाही. रूग्णांना योग्य ती सेवा मिळत नाहीत. रूग्णवाहिकेच्या वाहन चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे असे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरावीत अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.