*अनिता मसराम महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२३ ने सन्मानित*
★ वर्धा येथे झाला सत्कार
नागपूर : ( दि. ६ सप्टेंबर २०२३ ) आकार मल्टिपर्पज फाउंडेशनच्या संस्थापक, पत्रकार अनिता मसराम यांना नुकतेच वर्धा येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले.
परभणी येथील जयहिंद सेवा भावी शिक्षण संस्थेच्या २७ व्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार २७ ऑगस्ट रोजी वर्धा येथे करण्यात आले होते. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस, हरियाणा उच्च न्यायालय, व चंदीगडचे माजी न्यायमूर्ती अरुण चौधरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराष्ट्र विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, नागपूर पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत उदगीर, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, मुंबई आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील कुमरे व आयोजक जयहिंद सेवा भावी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सत्तार इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनिता मसराम यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.