जवाहर गुरुकुल शाळेत माझी माती माझा देश शपथ*
नागपुर: ( दि. ११ ऑगस्ट २०२३ ) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त माझी माती माझा देश अंतर्गत नंदनवन येथील जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळे तर्फे शाळेच्या प्रांगणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाची सांगता सोहळा दिनांक ९ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाला असून सदर सांगता सोहळ्याच्या निमित्य राज्यात" मेरी माटी मेरा देश "हा उपक्रम केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत पंचप्राण शपथ कार्यक्रम शुक्रवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा नंदनवन येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय निंबाळकर यांनी उपस्थित शिक्षक विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे शपथ देण्यात आली. भारतात २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वर्षाच्या गौरव करू, भारताची एकात्मता वैशाली करू, आणि आणि देशाच्या संरक्षण करण्याप्रती सन्मान बाळगू देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू, यावेळी शाळा समिती सदस्य अंकिता मानकर शाळेतील शिक्षिका नीता बोधे, पौर्णिमा भोसले, अरुणा कुराटकर ,शिक्षकेतर कर्मचारी तुषार चापले ,आकाश कोकोडे ,व सर्व विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होते.