राजु पारवेच्या लोकसंवाद यात्रेला पारशिवनी तालुक्यात उंदड प्रतिसाद
★ हजारोंच्या संख्येनी कार्यकर्त्याचा सहभाग, आ. आशिष जयस्वालने वाढवला उत्साह
पारशिवनी (दि. २ एप्रिल २०२४ ) रामटेक लोकसभा मतदार क्षेत्राचे महायुतीचे शिवसेना ( शिंदे गट ) चे उमेदवार राजू पारवे यांच्या जनसंवाद प्रचार यात्रेला रामटेक क्षेत्रातील पारशिवनी तालुक्यात उदंड प्रतिसाद लाभला. प्रचार यात्रेमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रचार रथासोबत क्षेत्रातील आमदार आशिष जयस्वाल यांनी पदयात्रा करीत कार्यकर्त्यात उत्साह निर्माण केला.
पारशिवनी तालुक्यातील तामसवाडी, गुंढरी वांढे, पारशिवनी शहर, करंभाड, दहेगाव जोशी, निंबा, सावळी, सालई मोकासा, चारगाव, नेऊरवाडा, माहुली, नयाकुंड, आमडी, साटक, बनपुरी, निमखेडा (बो), टेकाळी खदान, कांद्री व कन्हान आदी भागात प्रत्येक वस्तीमध्ये आणि चौकांमध्ये राजु पारवे व आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. विविध समाजातील संघटनानी लोकसंवाद यात्रेत सहभागी होऊन पारवे यांना लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. वयोवृध्द महिलांनी पारवेना औक्षण करून पुष्पहार व गाठी दिली. जेष्ठ नागरिकांनी पुढे येऊन निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. आ. आशिष जयस्वाल यांनी गावकऱ्यांशी संवाद सादला व राजु पारवे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा, असे नागरिकांना आवाहन केले. या लोकसंवाद यात्रेत आशिष काकडे, नाना आदमणे, दिपक शिवरकर, विलास कुकरे, उमेश सूरकार, विलास भक्ते, किशोर भगत, योगेश चवरीवार, शेषराव दुनेदार, किशोर पारधी, प्रल्हाद महाजन, अलकेश वाघाडे, राजु भोस्कर, जगजीवन बर्वे, मंगल देशमुख, अनुप भुते, नंदु लेकुरवाडे, नरहरी पोटे, वर्धराज पिल्ले, योगराज घरपडे, शुभम गभन, विनायक महादुले, मनोज कोठे
, प्रशांत भुरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.