कान्हादेवी येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न
पारशिवनी: (दि.९ जुलै २०२४) "आपला आमदार आपल्या सेवी अभियान" अंतर्गत आमदार अॅड.आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर पारशिवनी तालुक्यातील कान्हादेवी येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण-९२ लाभार्थीनी लाभ घेतला.मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-१४, व चष्मे करिता-७८ लाभार्थी यांनी लाभ घेतला.
या प्रसंगी लिलाधरजी पचपोंगळे, साधनाताई दड्रेमल, सुधाकरजी नेवारे, सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या शिबिरात महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.
आमदार आशिष जयस्वाल यांनी "आपला आमदार आपल्या सेवी" अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे. याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.