गोंदिया जिल्हा न्यायालयात संविधान उद्देशिकेचे वाचन
गोंदिया (दि.३० नोव्हेंबर २०२४) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय गोंदिया येथे २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमीत्त संविधान उद्देशिकेचे वाचनाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे २६ नोव्हेंबरला भारतीय संविधान दिनानिमित्य संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अरविंद वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये ए.एस. प्रतिनिधी जिल्हा न्यायाधीश-१, एम.टी.असीम जिल्हा न्यायाधीश-२, एन.डी.खोसे जिल्हा न्यायधीश-३, डी.व्ही. हरणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, ए.व्ही. कुलकर्णी मुख्य न्यायदंडाधिकारी, एस.आर.मोकाशी सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, नरेश वाळके सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, श्री. मोहोड दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पी.एन.ढाणे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, वाय.के.राऊत दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, एम.बी.कुडते तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, वाय.जे.तांबोळी चवथे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, टी.व्ही.गवई पाचवे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, डॉ. एस.व्ही.आव्हाड सहावे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सर्व न्यायीक अधिकारी वर्ग, वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अरविंद वानखेडे यांनी व सर्व उपस्थित न्यायीक अधिकारी, वकील वर्ग व न्यायीक कर्मचारी वृंद यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर द्विप प्रज्वलीत करून प्रतिमेचे पुजन केले. त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून उपस्थित सर्वांनी त्यांच्या पाठोपाठ वाचन केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना त्यांनी संविधान व उद्देशिकेचे महत्व, सामान्य नागरिकांना संविधानिक मौलिक गरजा, मौलिक अधिकार व संविधानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना कशाप्रकारे सामाजिक संरक्षण प्राप्त होतो, त्यांचे बचावात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. मिना भोवते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील अधीक्षक पी.वी.अनकर, वरिष्ठ लिपीक ए.एम.गजापुरे, कनिष्ठ लिपीक एस.डी.गेडाम, के. एस.चौरे, शिपाई बी.डब्लु पारधी, आर.ए.मेंढे यांनी मोलाचे सहकार्य केले.