जिल्हास्तरीय युवा महोत्सव २ डिसेंबरला
गोंदिया ( दि.३० नोव्हेंबर २०२४ ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रिडा परिषद गोंदिया, नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आायोजन २ डिसेंबर रोजी बुध्दिष्ट समाज संघ संस्थागार, जिल्हा क्रिडा संकुल जवळ, गोंदिया येथे करण्यात येणार आहे.
सदर महोत्सवा अंतर्गत युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे तसेच महाराष्ट्र राज्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पनावर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने विज्ञान व तंत्रज्ञान नवसंकल्पना आधारित प्रदर्शन- सहभाग संख्या ५. सांस्कृतिक समुह लोकनृत्य- सहभाग संख्या १०, समुह लोकगीत- सहभाग संख्या १०. कौशल्य विकास कथालेखन-१, चित्रकला स्पर्धा-१, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी)-१, कविता-१. युथ आयकॉन-१० यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त फोटोग्राफी स्पर्धा- सहभाग संख्या १, विज्ञान व तंत्रज्ञान नवसंकल्पना आधारित प्रदर्शन- सहभाग संख्या १ फक्त जिल्हास्तरीय घेण्यात येणार आहे
वरील नमुद सर्व स्पर्धा बाबींमध्ये गोंदिया जिल्ह्यातील संगीत महाविद्यालय, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, महिला मंडळ, सांस्कृतिक मंडळ, जिल्ह्यातील इंजिनिअरींग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इत्यादी १५ ते २९ वयोगटातील युवक व युवतींना सहभाग घेता येईल. शासनाकडून अनुदान प्राप्त होताच प्राविण्यधारकास रोख पारितोषिक देण्यात येईल.
स्पर्धेच्या अटी व शर्ती, सविस्तर माहिती व प्रवेश नोंदणीकरीता जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. संपर्कासाठी नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रृती डोंगरे मो.8459172275, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या जयश्री भांडारकर मो.8847789212, क्रिडा अधिकारी ए.बी.मरसकोले मो.9420144333, क्रिडा मार्गदर्शक अविनाश निंबार्ते मो.7507493094, आकाश भगत मो.9765689705 यांचेशी संपर्क साधावा.
तरी गोंदिया जिल्ह्यातील वरील स्पर्धेतील अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या युवक-युवतींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले आहे.