नागपूर
20-10-2023 11:17:01
Mission Maharashtra
सुचिता कुनघटकर वसुनंदिनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२३ सन्मानित
नागपूर : ( दि. २० ऑक्टोंबर २०२३ ) वसुनंदिनी आणि फाउंडेशन जामनेर, जिल्हा जळगाव च्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सुचिता गोपाल कुनघटकर यांना वसुनंदिनी राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ ने जळगाव येथील अल्पबचत भवन सभागृहात सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतभूषण डॉ. चिदानंद फाळके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. केतकी वैभव पाटील, एड आश्रीनी डोलारे, ह. भ. प. डॉ. शंतनू महाराज रसे, मा. शुभांगी गोपीनाथ गुरव. सुरेश मुळे,वसुंनंदिनी फाउंडेशन चे अध्यक्ष विद्याधर सोनवणे व संस्थापक सचिव माधुरी कुळकर्णी उपस्थितीत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतभूषण डॉ. चिदानंद फाळके यांनी सुचिता कुनघटकर शाल, श्रीफळ, स्मृति चिन्ह देवून वसुनंदिनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२३ सन्मानित करण्यात आले.