समाजाचे चित्र बदलण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांचा सत्कार सार्थ असतो - खा शरदचंद्र पवार
सार्थक फाउंडेशन तर्फे समाजसेवकांचा सत्कार
नागपूर: ( दि. १८ ऑगस्ट २०२४) क्षेत्र कुठलेही असो त्या क्षेत्राला स्वतःला वाहून त्यात काम करणे आणि त्यातून समाजाच्या बदलासाठी संघर्ष करणे हे महत्त्वाच आहे. नागपूर शहराने अनेक समाजसेवकांची मालिका देशासाठी दिली हे आपल्याला विसरून चालणार नाही. समाजातील समस्यांचा अभ्यास करून समाजाचे चित्र बदलण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी असणारे लोक खूप कमी आहेत आणि अशा समाजसेवकांचा केलेला सत्कार हा सार्थ ठरतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी आज येथे व्यक्त केले.
सार्थक फाउंडेशन व त्यांच्या चाळीस सहयोगी संस्थांच्या वतीने हिंगणा येथे आयोजित समाजसेवकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार व माजी मंत्री रमेशचंद्र बंग व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी
मोलकरीण संघटनेच्या प्रणेत्या, कष्टकरी गोरगरीब महिलांसाठी झटणाऱ्या रूपाताई कुलकर्णी, पर्यावरण क्षेत्रात मोठे कार्य करणारे राजभवन येथील प्रधान सचिव रमेश येवले व शिक्षण क्षेत्रात कलात्मकतेनी विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण निर्माण करून संघटना, सहकार यांचे धडे कृतीतून देणारे आदर्श शिक्षक धनंजय पकडे यांचा शरदचंद्र पवार यांच्या हस्ते
शाल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी अध्यक्ष भाषणातून समाजसेवकांबद्दल सार्थक ने व्यक्त केलेल्या कृतज्ञकरिता सार्थक ची प्रशंसा केली तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार व माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी सुद्धा सार्थक च्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्थक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश बंग, सूत्रसंचालन विनोद चतुर्वेदी तर आभार संजय पालीवाल यांनी मानले. यशस्वीतेसाठी सार्थक फाउंडेशनचे विश्वस्त राजाभाऊ टाकसांडे, पंकज महाजन, अजय मल, सुधीर बाहेती यांनी परिश्रम घेतले.
या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला माजी आमदार विजय घोडमारे (पाटील )माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार प्रकाश गजभिये, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ गिरीश गांधी, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते दिनेश बंग, जि प सदस्य सलिल देशमुख, शब्बीर विद्रोही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे, राजू राऊत, प्रेम झाडे, वेदप्रकाश आर्या, बजरंग सिंग परिहार,रमण ठवकर,नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश नागपुरे, हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, श्रीराम काळे,ऍड. शंतनू घाटे, संतोष नरवाडे, श्याम मंडपे, सुरेंद्र मोरे, हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कावळे, नागपूर पंचायत समितीच्या सभापती रूपाली मनोहर, जि प सदस्य वृंदा नागपूर, माजी जि प सभापती उज्वला बोढारे, जि प सदस्य प्रकाश खापरे, मोनू सिंग,प्रवीण कुंटे, मुकेश ढोमणे, रोशन खाडे, प्रवीण सिंग, मधु मानके,अश्विन बैस, प्रकाश कोकाटे,बालू सवाने, अमजद शेख, माजी महापौर शेखर सावरबांधे, सुशील दीक्षित, प स सदस्य सुनील बोंदाडे, पोर्णिमा दीक्षित, अनुसया सोनवाने, वैशाली काचोर,गुणवंता चामाटे, प्रवीण घोडे, दादाराव इटनकर, मेघा भगत, विशाखा लोणारे, पुरुषोत्तम डाखळे, हरिभाऊ रसाळ, प्रशांत सोमकुवर, विलास भागवत, नीरज पयासी, शैलेश थोराणे, शिराज शेटे,दिनेश ढेंगरे, जावेद महाजन, प्रेमलाल भलावी आदीसह सार्थक फाउंडेशनच्या चाळीस सहयोगी संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.