धरती धोरारी २०२३ जल्लोषात साजरा
( मारवाडी युवा मंच नागपूर व मीडटाउन नागपूरचे आयोजन )
हिंगणा: ( दि. १४ ऑक्टोंबर २०२३ ) मूळचे राजस्थान व महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांकरिता मारवाडी युवा मंच नागपूर व मिडटाऊन नागपूर यांच्यावतीने धरती धोरारी २०२३ हा सांस्कृतिक नृत्य व गायन स्पर्धांचे कार्यक्रम शहरातील कवीवर्य सुरेश भट सभागृहाच्या ऑडिटोरियम मध्ये मोठ्या जल्लोषात पार पडला. राजस्थानी नृत्य,गीतांनी सभागृहाची वातावरण राजस्थानमय झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते हल्दीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवकिसन अग्रवाल, मारवाडी युवा मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र भट्टळ,अतुल कोटेचा, सुनील अग्रवाल, कैलास राठी, नितेश गुप्ता, रामकिशोर वर्मा, सुनील खाबिया,संगीता राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
स्पर्धेत १२ नृत्य समूह व ११ गीत गायन स्पर्धकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेतील सादरीकरणाच्या माध्यमातून राजस्थानी पारंपरिक सणांमधील होळी, सालासर बालाजी, कृष्ण जन्माष्टमी, नवरात्री, तिज, शिवरात्री , दीपावली, गनगौर आदी विलोभनीय देखाव्यांचे सादरीकरण करून उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
नृत्य स्पर्धेतील प्रथम पुरस्कार नगर माहेश्वरी महिला समिती यांना द्वितीय लक्ष्मी अनुबंध माहेश्वरी महिला संघटन तृतीय श्री बिकानेरी माहेश्वरी महिला समिती यांना तर उत्तेजनार्थ पालिवाल सुपर वुमन व आनंदम के सितारे यांना देण्यात आला तर गीत गायन स्पर्धेत प्रथम लक्ष्मी अनुबंध माहेश्वरी महिला संघटन द्वितीय श्री राजस्थान महिला ब्राह्मण समाज मंडळ, तृतीय दाधीच महिला संघटन यांना तर उत्तेजनार्थ ब्राह्मण सहेली ग्रुप व श्री बिकानेरी माहेश्वरी महिला समिती यांना देण्यात आले. दोन्ही गटातील स्पर्धकांना अनुक्रमे २१ हजार १५ हजार ११ हजार तर उत्तेजनार्थ ५ हजार व ३ हजार रोख पुरस्कार देण्यात आले. स्पर्धेला परीक्षक म्हणून गायन स्पर्धेकरता मुकेश छागाणी, सुरभी ढोमणे नृत्य स्पर्धेकरिता पूनम राठी अवंती काटे यांनी जबाबदारी पार पाडली कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण मारवाडी युवा मंचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग यांनी प्रास्ताविक अध्यक्ष कन्हैया मंत्री यांनी मंच संचालन अरुणा बंग यांनी तरं आभार अंजली मंत्री यांनी मानले. आयोजनाकरिता मारवाडी युवा मंचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग, अध्यक्ष कनैया मंत्री,सचिव हेमंत शर्मा, मिडटाऊनच्या अध्यक्ष अंजली मंत्री, सचिव डॉ. प्राची अग्रवाल, राज चांडक, अरिहंत बैस, सचिन अग्रवाल, आनंद राठी, राजेश मोहता, पूजा राठी,रचना बुब, जयश्री छाडेजा , मधु शर्मा, वर्षा शर्मा, मानसी पनपालिया, यांनी परिश्रम घेतले.