पर्यावरण पूरक सायकल रॅली ने वन्यजीव सप्ताहाचे थाटात उद्घाटन*
नागपूर : ( दि. १ ऑक्टोंबर २०२३ ) समाजामध्ये वने आणि वन्यजीव यांच्याबद्दल व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने देशभर १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे नियोजन केले जाते. या सप्ताहाचे उद्घाटन आज रविवार १ ऑक्टोंबर रोजी सकाळी नागपूर येथे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख ) शैलेश टेंभूर्णीकर यांच्या हस्ते पर्यावरण पूरक सायकल रॅली ला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
या प्रसंगी महिप गुप्ता, (प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)), कल्याण कुमार (अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक), आशा वेणुगोपाल (रोटरी जिल्हा गव्हर्नर), श्रीलक्ष्मी ए. (वनसंरक्षक, नागपूर) अजय पाटील (अध्यक्ष, वनरक्षक आणि पदोन्नत वनपाल संघटना) डॉ. प्रभू नाथ शुक्ल, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर आणि डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर हे उपस्थित होते.
सायकल रॅलीची सुरुवात वन्यजीव गीताने करण्यात आली. या रॅलीत १५० सायकल स्वारांनी सहभाग नोंदवला. सकाळी ७ वाजता या सायकल रॅली ची सुरुवात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांचे कार्यालय, वनभवन, रामगिरी रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे होऊन फुटाळा तलाव अंबाझरी महाराष्ट्र वन विकास महामंडळ कार्यालय हिंगणा टी पॉइंट- . छत्रपती चौक या मार्गे झिरो माईल्स, येथे समाप्ती करण्यात आली. या दरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सायकल स्वारानी साधारण २० कि.मी. चे अंतर पार केले. सहभागी सायकल स्वारांना रोटरी क्लब च्या वतीने टी- शर्ट पुरविण्यात
कार्यक्रमाच्या शेवटी प्रातिनिधिक स्वरूपात काही सायकल स्वारांनी आपले अनुभव विषद केले, यशस्वी रित्या रॅली पूर्ण करणाऱ्या सायकल स्वारांना वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शैलेश टेंभूर्णीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांचे कार्यालय, वनभवन येथे किशोर मानकर, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, नागपूर तसेच श्रीलक्ष्मी ए. (वनसंरक्षक, नागपूर) यांच्या नेतृत्त्वाखाली वनसंरक्षक कार्यालय, येथे स्वच्छता श्रमदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. प्रितमसिंह कोडापे, वि. व.अ. श्रीमती सोनल मते, वि. व. अ. पेंच व्याघ्र प्रकल्प तसेच नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक श्री. अजिंक्य भटकर (वरिष्ठ प्रकल्प अधिकारी), श्री. उधमसिंग यादव आणि श्री. अविनाश लोंढे तसेच श्री. कुंदन हाते, विभागातील सर्व सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी, स्थानिक संस्था प्रतिनिधी यांनी कष्ट घेतले.
यावर्षी साजरा होणाऱ्या वन्यजीव सप्ताह निमित्त १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान नागपूर वनवृत्त, सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर आणि पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता सेमिनरी हिल्स येथील बालोद्यान आणि जपानी गार्डन मध्ये निसर्ग भ्रमंती चे नियोजन असून याचा आस्वाद सर्वांना घेता येईल. या उपक्रमामध्ये सर्व व्यक्ती आणि संस्था यांनी हिरीरीने सहभाग नोंदवावा. असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.