एमआयएम च्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश
★ उत्तर नागपुरात कॉग्रेस कार्यकर्त्यांचा संम्मेलन
नागपूर ( दि. ८ ऑगस्ट २०२३):
उत्तर नागपूरचे आमदार व माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या आदेशानुसार नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी अंतर्गत ब्लॉक १४ तर्फे नवीं बस्ती टेका येथे कॉग्रेस कार्यकर्ता सम्मेलन आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे हे होते. तरप्रमुख पाहुणे म्हणून ब्लॉक १४ चे अध्यक्ष दीपक खोबरागड़े उपस्थित होते.
या वेळेस एमआईएम चे ४० ते ५० कार्यकर्त्यानी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. नितिन राऊत यांच्यावर विश्वास व्यक्त करून काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची शपथ घेतली. यावेळी इफ्तेखार अंसारी सचिव नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी आणि ब्लॉक १४ चे महामंत्री एड जितेंद्र वेलेकर, लालाजी जायसवाल, संदीप सहारे, इंद्रपाल वाघमारे, सलमान अंसारी, लुकमान अंसारी, जलील अंसारी, तसेच असंख्य काँगेस कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशश्वी करण्याकरिता दीपक गजभिये, नथु रोकड़े, प्रवीण मेश्राम, व इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.