सर्वधर्म समभाव शांति सम्मेलन एव विश्वशांति पुरस्कार समारोह २०२३ चे आयोजन २५ ला
★ मध्यप्रदेश येथील बैतूल जिल्हयातील आमला येथे आयोजन
★ २१ देशातील बौद्ध प्रतिनिधि राहणार उपस्थित
नागपुर दिनांक (२३ जून २०२३) गगन मलिक फाउंडेशन इंडिया तर्फ सर्वधर्म समभाव शांति सम्मेलन एव विश्वशांति पुरस्कार समारोह २०२३ चे आयेजन रविवार २५ जून रोजी मध्यप्रदेश येथील बैतूल जिल्हयातील आमला येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जवळपास २१ देशातील बुद्धिस्ट प्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांचे आगमन २४ जून रोजी रात्री ८ व ११ वाजता नागपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय विमानतळावर होणार आहे.
यात विजयदासा राजाबक्षे सामाजिक न्याय मंत्री श्रीलंका, नवीन गुणरत्ने अध्यक्ष लाइट एशिया फाउंडेशन श्रीलंका, सोक्या चोम, पर्सनल असिटेंट प्रधानमंत्री कार्यालय श्रीलंका,वर्ल्ड अलाइंस ऑफ बुद्धिस्ट के अध्यक्ष डॉ. पोर्नचाई पियापोंग थाईलैंड, सिस्टर मिथिला बांग्लादेश, साबुज बरुवा बांग्लादेश, सिस्टर नीनिये म्यांमार, डॉ. ली कीट यांग दुबई, फाई यान व्हियतनाम, डॉ. योंग मून साउथ कोरिया, कैप्टन नटकीट थाईलैंड , डॉ.पोंगसांग थाइलैंड यांच्यासह अन्य देश, विदेशी प्रतिनिधींचा समावेश राहणार आहे.रात्री नागपूर येथे मुक्काम करून रविवार २५ जून रोजी सकाळी ७ वाजता दिक्षाभूमि येथे भेट देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलसाचे दर्शन घेऊन कार्यक्रम स्थळाकरीता प्रस्थान करतील. त्यांच्या सोबत गगन मलिक फाउंडेशन इंडिया चे अध्यक्ष गगन मलिक हे राहणार असल्याची माहिती गगन मलिक फाउंडेशन इंडिया चे समन्वयक नितीन गजभिये यांनी दिली.