महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाचा सन्मान जपणार! * चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
* चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
* भूलभापांना बळी पडू नका
नागपूर: (दि. ८ नोव्होंबर २०२४) भाजपा-महायुती सरकारने मागील अडीच वर्षांत जनतेच्या कल्याणाचेच निर्णय घेतले. महायुतीने दिलेला शब्द पाळला. लाडक्या बहिणींसह महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाचा सन्मान जपण्याचे काम पुढेही सुरू राहणार असल्याचा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. महाविकास आघाडींच्या भूलभापांना बळी पडू नका असेही ते म्हणाले.
कामठी विधानसभा क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या नागपूर शहरातील नरसाळा व हुडकेश्वर या भागात श्री बावनकुळे यांनी शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रचार केला. श्री बावनकुळे यांनी नरसाळा येथील गुलमोहर कॉलनी, महाविष्णू नगर, नरसाळा जुनी वस्ती, गारगोटी, शिवांगी नगर, हुडकेश्वर येथील सूदर्शन नगर, चंद्रकिरण नगर, साई नगर क्र. १ या भागातील घरोघरी भेटी व छोट्या सभांमधून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. नरसाळा आणि हुडकेश्वर भागातील जनतेने त्यांचे स्वागत केले. नरसाळा आणि हुडकेश्वर हा भाग शहरात असला तरी देखील या भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यातही विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
या प्रचार दौऱ्यात त्यांच्यासह अजय बोढारे, भगवान मेंढे, किशोर कुंभारे, योगेश मगवी, डॉ. प्रीती मानमोडे, विद्या मगवी, पूजा धांडे, नीला हातीबेड, पिंटू बाळस्कर, प्रीती प्रधाने, सुनील मोहिते, आरती गिते, डी.डी. सोनटक्के, मनोज लक्षणे, विनोद मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे युवा आणि महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.