राशी पारधी हिला २०२३ चा कलाभूषण बाल पुरस्कार बहाल*
नागपुर : कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडिया च्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक नृत्यदिनी, बाल कलाभुषण जागतिक नृत्या दिनाच्या निमित्ताने २९ एप्रिल रोजी रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाच्या विद्यमाने आयोजित नृत्य कलाभुषण बाल पुरस्कार २०२३ या कार्यक्रमात माऊंट फोर्ट स्कूल अशोकवनच्या इयत्ता ५ वी ची विद्यार्थिनी राशी सचिन पारधी हिला कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर कुणाल आनंदम यांच्या हस्ते नृत्य कलाभुषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. भारत देशातून आलेल्या अनेक स्पर्धांकांपैकी राशीची निवड करण्यात आली. ती या यशाचे श्रेय तिचे नृत्य गुरूवर्य मनिष पाटील व जय हरणे आणि किशन वर्मा यांना देते. तसेच तिच्या या यशामागे तिच्या आई वडिलांचा विशेष योगदानचा मोठा वाटा आहे. वरील स्तरावरील राशि पारधी वरील अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थीगण उपस्थित होते.