कुणाल राऊतला दुहेरी विजेतेपद
कुणाल राऊतला दुहेरी विजेतेपद
नागपूर, ता. ६ : पत्रकार क्लब ऑफ नागपूर आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मीडिया कॅरम स्पर्धेत कुणाल राऊतने पुरुष एकेरी व दुहेरी गटात विजेतेपद पटकाविले.
सिव्हिल लाइन्स येथील प्रेस क्लबमध्ये रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात कुणालने विजय ठाकूरला २५-६, २५-७ ने पराभूत केले. नसीम शेखने संदीप गाडगेला २५-० ने नमवून तिसरे स्थान प्राप्त केले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात कुणाल व विनोद सूर्यवंशी या जोडीने भिमराव लोणारे व सुभाष शर्मा या जोडीला २५-६ ने पराभूत केले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतील विजय ठाकूर व गिरीश ठाकरे या जोडीने परितोष प्रामाणिक व नसीम शेखला २३-११ ने पराभूत केले.
पत्रकार क्लबचे सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर, सचिव परितोष प्रामाणिक, कोषाध्यक्ष नीलेश देशपांडे व स्पर्धेचे संयोजक चारुदत्त कहू उपस्थित होते. संचालन व आभारप्रदर्शन नरेश शेळके यांनी केले.