यशवंत मोहिते पी.आर.एस. आय .नागपूर चॅप्टरचे नवे अध्यक्ष*
नागपूर : (२१ जून २०२३) पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) नागपूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी यशवंत मोहिते यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार २१ जून २०२३ रोजी PRSI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव संस्थेने मांडला. निवर्तमान अध्यक्ष एस.पी.सिंग उपस्थित होते.सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दिला. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये अखिलेश हळवे (महामेट्रो) यांची उपाध्यक्षपदी, मनीष सोनी (नागपूर महानगरपालिका व नागपूर स्मार्ट सिटी) सचिवपदी, प्रसन्न श्रीवास्तव (महावितरण) यांची सहसचिवपदी आणि शरद मराठे (मध्य प्रदेश पर्यटन मंडळ) यांची खजिनदार म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
प्रवीण टाके (जिल्हा माहिती अधिकारी), डॉ. मनोज कुमार (वेकोली), प्रवीण स्थूल (महावितरण), अमित बाजपेयी (एएए मीडिया) आणि निखिल सावरकर (पी आर टाइम्स) यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.
हेमराज बागुल (माहिती संचालक), अनिल गडेकर माजी जिल्हा माहिती अधिकारी, एमएम देशमुख माजी जनसंपर्क अधिकारी आणि एसपी सिंग, डॉ.मोईज हक, डॉ.नितीन कराळे, प्रदीप कुमार मैत्र, शिरीष बोरकर हे संस्थेचे पालक/सल्लागार म्हणून काम पाहतील.
विशेष म्हणजे नागपुरात जनसंपर्क कर्मचार्यांची ही संघटना गेल्या अडीच दशकांपासून कार्यरत आहे.नियमित विविध उपक्रमांसोबतच कोरोनाच्या काळात PRSI च्या कल्याणकारी उपक्रमांतर्गत पोलिस कर्मचारी व इतर गरजूंना मदतीचा हात पुढे केला गेला आणि कोविड काळातील कार्याबद्दल खूप कौतुक करण्यात आले. PRSI नागपूर चॅप्टरला गेल्या काही वर्षांमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले आहे.