रामटेक पंचायत समितीमध्ये शासकीय पट्टे वाटप
★ १६७ कुटुंबधारकांना रामटेकचे आमदार अॅड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले शासकीय पट्टे वाटप
रामटेक : ( ४ मार्च २०२४ ) पंचायत समिती रामटेक अंतर्गत सर्वांसाठी घरे २०२२ अंतर्गत शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या रामटेक तालुक्यातील १६७ कुटुंबधारकांना रामटेकचे आमदार अॅड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते शासकीय पट्टे वाटप करण्यात आले. यात ग्रामपंचायत सोनेघाट - ५९, नवरगाव ५४, खुमारी- ०८, उमरी (चि.) ३७, मानापुर - ०९ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, तहसीलदार रमेश कोळपे, गट विकास अधिकारी जयसिंग जाधव, पंचायत समिती सभापती नरेंद्र बंधाटे, पं. स. चंद्रकांत कोडवते, कलाताई ठाकरे, मंगला सरोते व लाभधारक उपस्थित होते. तालुक्यातील उर्वरित अतिक्रमण धारकांना तात्काळ पट्टे वाटप करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार अँड. आशिष जयस्वाल यांनी दिले असून ज्या लाभाथ्यांना पट्टे मिळाले आहे.
त्यांनी शासनाच्या रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी सुभाष सानप तर प्रास्ताविक गट विकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी केले. या कार्यक्रमात सरपंच, सचिव, सदस्य व लाभार्थी उपस्थित होते.