समाजीक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी महालक्ष्मी रेसकोर्स मैदान येथे भेट देऊन धम्म परिषदेच्या तयारीची पाहणी केली.
समाजीक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी महालक्ष्मी रेसकोर्स मैदान येथे भेट देऊन धम्म परिषदेच्या तयारीची पाहणी केली.
नागपूर : ( दि. १५ ऑक्टोंबर २०२३ ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म दिक्षा समारोह समिती च्या वतीने येत्या दि.16 डिसेंम्बर 2023 रोजी महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानात जागतिक बौद्धधम्म परिषदे चे आयोजन करण्यात आले आहे. 200 एकर वर महालक्ष्मी रेसकोर्सचा परिसर असून येथे येत्या शनिवारी 16 डिसेंम्बर बौद्ध अनुयायांचा चलो बुद्ध की ओर चा नारा देत विश्वशांती साठी जागतिक बौद्ध धम्म परिषद पूज्य दलाई लामा यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यांची माहिती घेण्याकरीता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय समाजीक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज महालक्ष्मी रेसकोर्स मैदान येथे भेट देऊन धम्म परिषदेच्या तयारीची पाहणी केली.
यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; सुरेश बारशिंग; तसेच भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो; पद्मश्री कल्पना सरोज; दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे चांद्रबोधी पाटील; युनायटेड बुद्धीस्ट फेडरेशन चे अध्यक्ष अविनाश कांबळे ; रिपाइं चे पश्चिम विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर;नागसेन कांबळे; रवी गरुड; सुनील मोरे; सचिनभाई मोहिते; एस .युवराज; चंद्रशेखर कांबळे; घनश्याम चिरणकर; रवी गायकवाड; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.