नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
नवमतदारांचा उत्साह बघून व्यक्त केला आनंद*
*नागपूर : ( दि. १९ एप्रिल २०२४ ) नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. महालच्या टाऊन हॉल येथील मतदान केंद्रावर ना. गडकरी यांच्यासोबत कांचन गडकरी, निखील व ऋतुजा गडकरी, सारंग व मधुरा गडकरी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आपण साजरा करीत आहोत आणि त्यात नागपूरकर अतिशय उत्साहाने सहभागी झालेत, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. मतदान केल्यानंतर गडकरींनी सर्व सहा मतदारसंघांमध्ये फेरफटका मारला. यावेळी नवमतदारांचा उत्साह बघून त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रत्येक बुथवरील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला आणि मतदानाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य जनतेचे सहकार्य करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.
नागपूरकरांचे आभार
नागपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदारांचे आभार. भाजप कार्यकर्त्यांनी कडाक्याच्या उन्हात आणि अवकाळी पावसात उत्साहाने काम केले, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. आज दिवसभर बुथवर कार्यकर्ते आणि नागरिकांना भेटल्यानंतर निर्धारित केलेले लक्ष्य साध्य होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.