वनभवन येथे राष्ट्रीय वनहुतात्मा दिनानिमित्ताने वनहुतात्म्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
नागपूर: ( दि. ११ सप्टेंबर २०२४ ) वन आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावित असतांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनअधिकारी आणि वन कर्मचारी यांच्या स्मरणार्थ बुधवार ११ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन हुतात्मा दिना निमीत्ताने वन विभागातर्फे वन विभागाच्या राज्य मुख्यालयी वनभवन, नागपूर येथे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) श्रीनिवास राव यांच्या अध्यक्षते खाली श्रध्दांजली कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीनिवास राव यांनी वनहुतात्म्यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वनहुतात्म्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी श्रीनिवास राव यांनी वन हुतात्म्यांना श्रध्दांजलीपर संवेदना व्यक्त करतांना म्हणाले हौतात्म्ये पत्करणा-या वन अधिकारी व कर्मचा-यांची कर्तव्य आणि समर्पण भावना निश्चितच सर्वांना वनसंरक्षणाची भावना शिकवुन जाणारी आहे, त्यांच्या या अतुलनीय बलिदानाचे सदैव स्मरण राहील व सर्वांना प्रेरणा मिळत राहील. वनसंरक्षणाची जबाबदारी पार पाडतांना वनअधिकारी व कर्मचा-यांना नुकसान झाल्यास वनविभाग पुर्णतः त्यांच्या पाठीशी उभे राहील व सर्वोतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
या वेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळुन तसेच स्मारकावर पुष्प वाहुन वनहुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. या प्रसंगी भारतीय वन सेवेतील वरिष्ठ वनअधिकारी आणि इतर अधिकारी, वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. राजेश मेश्राम यांनी केले.