गावात सामाजिक एकोपा जोपासणे गरजेचे; माजी मंत्री रमेशचंद्र बंग
महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देश मंडळाद्वारे विजयादशमी उत्सव उत्साहात साजरे
हिंगणा ( दि. १४ ऑक्टोंबर २०२४) सर्वधर्मसमभाव जोपासून प्रत्येक माणसाला मान सन्मानाची वागणूक देऊन प्रत्येकाच्या कामात पडणे हीच खरी माणुसकी असून गावागावात सामाजिक एकोपा जोपासल्यानेच गावाच्या सर्वांगीण प्रगतीचे मार्ग मोकळे होतात असे महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय मंडळ रायपूर हिंगणा यांच्या वतीने आयोजित विजयादशमी उत्सवात अध्यक्ष स्थानावरून बोलताना राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग बोलत होते.
महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय मंडळ माळीपुरा रायपूर यांच्यावतीने मागील ५८ वर्षापासून रायपूर येथील दसरा उत्सव मैदानावर विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तीच परंपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक कार्य करणारे प्रमोद बंग, अशोक कुंभरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांना शाल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तर माळी समाजात समाजाकरिता योगदान देणारे माळी महासंघाचे नागपूर (ग्रा) जिल्ह्याचे अध्यक्ष बाळकृष्ण येनकर यांना यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.
कार्यक्रमाला रायपूर जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य दिनेश बंग, पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे, अनिल चानपूरकर, जगदीश कनेर, उपसरपंच शिराज शेटे,जावेद महाजन, शशिकांत थोटे, मंडळाचे अध्यक्ष मुकेश कथलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रभू रामचंद्रांची झाकी गावात भ्रमण करून आल्यानंतर विजयादशमीच्या मुख्य सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यात श्रीरामाच्या भूमिकेत सात्विक मेडजोगे, लक्ष्मणाच्या भूमिकेत स्वराज मेडजोगे, माता शितेच्या च्या भूमिकेत स्वाती भोयर तर श्री हनुमानाच्या भूमिकेत स्वरूप पाचपोर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन बनकर यांनी केले तर आभार समीर मेडजोगे यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीते , मनीष उमाळे, शंकर जांबुतकर, सचिन कथलकर, प्रकाश वानखेडे, देवेन उपवंशी, योगेश कथलकर, निलेश पाटील, प्रसन्न वानखेडे, तेजस चंदनखेडे, पलाश उमाळे, दीप जांभुतकर, अमोल कथलकर, अनिकेत उमाळे, अनिकेत चंदनकडे, ध्रुव कथलकर , आकाश कथलकर, साहिल उमाळे, हर्षल कथलकर, प्रज्वल खडतकर, अविनाश उमाळे यांनी परिश्रम घेतले.