गुणवंत विद्यार्थांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा उद्या
गुणवंत विद्यार्थांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा उद्या
नागपूर : ( १७ जुन २०२३ ) स्वाभिमान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने १०वी आणी १२वी च्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवत्त विद्यार्थाचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा उद्या रविवार १८ जुन रोजी सकाळी ११ वाजता शुक्रवारी तलावा जवळील शिक्षक सहकारी बॅकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व शिक्षण संस्था ( बार्टी ) चे जनरल डायरेक्टर सुनील वारे हे राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून विक्रीकर विभागाचे सहआयुक्त प्रदीप बोरकर, कमला नेहरु महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अशोक कांबळे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थानी उपस्थित राहण्याचे आवहान स्वाभिमान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन तायवाडे यांनी केले आहे.