नागपूर
14-05-2023 23:25:20
Mission Maharashtra
जमाअत ए इस्लामी हिंद तर्फे ईद मिलंन समारोह
नागपूर : ( दि. १४ मे २०२३ ) जमाअत ए इस्लामी हिंद नागपूरच्या वतीने सदर माऊंट रोड वरील हॉटेल एल. बी येथे रविवारी ईद मिलंन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या ईद मिलन समारोह कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून औरंगाबादचे जेष्ठ पत्रकार नौसाद उस्मान हे होते,
तर प्रमुख पाहुणे म्हणून जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर चे मीडिया सेक्रेटरी डॉ. एम. ए. रशीद उपस्थित होते. यावेळी नौसाद उस्मान यांनी रमजान ईद व रोजा यावर विस्तृत माहिती दिली. यावेळी विविध क्षेत्रातील पत्रकार व समाज बांधव मोठया संख्येनी उपस्थित होते.