जरीपटका परिसरात अल्पवयीन मैत्रिनीचा फेसबुक मित्राने केला विनयभंग
जरीपटका परिसरात अल्पवयीन मैत्रिनीचा फेसबुक मित्राने केला विनयभंग
नागपूर: (दि. २२ जून २०२३) जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मैत्रिनीचा चक्क तिच्याच फेसबुक मित्राने विनयभंग केल्या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली. अखिल राजु नागवंशी, (२०) रा. जरीपटका असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, जरीपटका भागात राहणारीअल्पवयीन मुलगी वर्षा (काल्पनिक नाव ) (१७), हिचे परिसरातीलच अखिल राजु नागवंशी यांच्यासी एक वर्षापूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती. फेसबुक चॅटिंग, व्हॉट्सअँप मेसेज व फोनच्या माध्यमातून त्यांच्यातील संवाद वाढत गेला. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अखिल हा तिला भेटण्याच्या बहाण्याने वारंवार घरी बोलवायचा घरी कुणीही नसल्याची संधी साधून व ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेत शारीरिक संबध प्रस्थापित करायचा एक वर्ष शारीरिक सुख घेतल्या नंतर तो तीला टाळू लागला.
यामुळे दुखावलेल्या वर्षाने घरच्याना आपबीती सांगितली. घरच्या मंडळीनी तीला घेऊन जरीपटका पोलिस स्टेशन गाठून मित्र अखिल यांच्या विरूध्द तक्रार दाखल केली. जरीपटका पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी अखिल यांच्यावर कलम ३७६/२ एन भा.द.वी. सहकलम ४,६ पोक्सो अँक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. पुढील तपास जरीपटका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सेठे करीत आहेत.