संत्रा मोसंबी उत्पादकांना मदत द्या अन्यथा आंदोलन – सलील देशमुख
नागपूर,( दि. २६ ऑगस्ट २०२३ ) मोठया प्रमणात नुकसान होवूनही संत्रा व मोसंबी उत्पादकांना अद्यापही मदत देण्यात आली नाही. अनेक शेतकरी मोबदल्यापासुन वंचीत आहेत. वंचीत असलेल्या संत्रा व मोसंबी उत्पादकांना तातडीने मदत देण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन उभ्यारण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परषिद सदस्य सलील देशमुख यांनी दिला आहे.
काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान होवून सुध्दा त्याचे पंचनामे करण्यात आले नव्हते. ही माहिती सलील देशमुख यांना समाजाताच त्यांनी कृषी अधिकारी व महसुल अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. जो पर्यत कृषी विद्यापिठाच्या संशोधकांचा अहवाल येत नाही तो पर्यत पंचनामे करता येणार अशी माहिती या चर्चातुन समोर आली. यानंतर सलील देशमुख यांनी कृषी विद्यापिठाच्या संशोधकांसोबत चर्चा करुन सर्वे करण्याचे सांगीतले आणि यानंतर काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.
पंचनामे करुन अहवाल जिल्हाधीकारी यांच्या मार्फत राज्य शासनाला सादर करण्यात आला. परंतु तरी सुध्दा मदत देण्यासाठी राज्य शासन उदासीन होते. माजी गृहमंत्री तथा काटोल व नरखेडचे आमदार अनिल देशमुख यांनी हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थीत केला. यानंतर राज्य सरकारने मदत देण्यास सुरुवात केली. परंतु ही मदत देत असतांना अद्यापही ४० टक्के संत्रा व मोसंबी उत्पादकांना मदत मिळाली नाही. या संदर्भात सलील देशमुख यांनी जिल्हाधीकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासोबत नुकतीच बैठक घेतली. यात शिल्लक असलेल्या ४० टक्के शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने त्यांना तातडीने ती मदत मिळवुन देण्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती सलील देशमुख यांनी केली.
बॅक खाते अपडेट करा
अनेक शेतकऱ्यांनी आपले बॅक खाते आधार कार्ड मॅपिंग केले नाही. यामुळे नुकसानीची मदत मंजुर होवून त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपले बॅक खाते आधार कार्ड मॅपिंग केले नाही अश्या शेतकऱ्यांची यादी संबधीत तहसीलदार यांनी तलाठी यांच्यामार्फत प्रत्येक गावात पोहचवीली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपले बॅक खाते अपडेट करावे असे आवाहन सुध्दा सलील देशमुख यांनी केले आहे.