अनाथ दिव्यांगनाना भोजनदान, मिठाई व कपड़े वाटून महादेवराव हरडे यांची पुण्यतिथी केली साजरी
★ जैन कलार समाज अन्याय निवारण संघर्ष समिती व हरडे कुटुंब परीवाराने केले आयोजन
नागपूर: ( दि. २१ मार्च २०२४ ) श्री गणेश मंदिर टेकडी नागपूर चे माजी उपाध्यक्ष *कै महादेवराव हरडे यांची १६ वी पुण्यतिथी अनाथ दिव्यांग मुले, मुली, वृध्दांना भोजनदान, मिठाई व कपड़े वाटून साजरी करण्यात आली.
जैन कलार समाज अन्याय निवारण संघर्ष समिती व हरडे कुटुंब परीवारा तर्फे आज गुरुवार २१ मार्च रोजी मेडिकल कॉलेज मार्गावरील उंटखाना येथील होम फॉर एजेंड ऍन्ड हॅन्डीकॅप येथे श्री गणेश मंदिर टेकडी नागपूर चे माजी उपाध्यक्ष *कै महादेवराव हरडे यांच्या १६ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सहाय्यक पोलिस आयुक्त जयेश भांडारकर, भूषण दडवे, विलास हरडे, दिलीप हरडे, सुरेंद्र हरडे, संजय लाखे, विकास भांडारकर, राजु ठवरे, प्रमिला हरडे, ऍड. माधुरी हरडे, वैशाली हरडे, अर्चना हरडे, कल्पना डाबरे आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी महादेवराव हरडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्विप प्रज्वलीत करून आदराजंली अर्पण करून येथील २५० ते ३०० अनाथ दिव्यांग मुले, मुली, वृध्दांना भोजन, मिठाई व कपड़े वाटून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी दिलीप हरडे यांनी सांगितले की, बाबुजी हे श्री गणेश मंदिर टेकडी नागपूर चे माजी उपाध्यक्ष होते व जैन कलार समाज न्यास रजिस्टर क्रमांक एफ ५६ नागपूर चे आजीवन सभासद होते व त्यांचा प्रयत्नांमुळे व सहकार्य मुळे आजीवन सभासदांची नोंदणी सुरू झाली आज ५८७ आजीवन सभासद आहेत त्यांची सामाजिक कार्याची आठवणींची जाणीव व्हावी यासाठी जैन कलार समाज अन्याय निवारण संघर्ष समिती तर्फे व हरडे कुटुंब व परीवारा तर्फे पुण्यतिथी साजरी करण्यात येत असल्याचेहि हरडे यांनी सांगितले.