देवदूताच्या रुपात झाली बावनकुळेंची भेट
• पोलिओग्रस्त प्रणयच्या पायांना मिळाले बळ!
• गादा गावातील गडेकर कुटुंबीयांना मदतीचा आधार
नागपूर: (दि. १६.११.२०२४) पोलिओग्रस्त प्रणयाच्या शस्त्रक्रियेसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदत केल्याने दोन्ही पायांनी अपंग असणारा प्रणय आता चालू लागला आहे. त्याच्या पायाला बळ मिळाले आहे. तो भविष्यात रोजगारक्षम व्हावा यासाठी सर्वोतोपरी मदत देण्याचे वचनही श्री बावनकुळे यांनी गादा गावात भेटी दरम्यान दिले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गडेकर कुटुंबीयांसाठी चंद्रशेखर बावनकुळे हे देवदुताप्रमाणे ठरले.
कामठी तालुक्यातील गादा गावचे शेतमजूर हिरालाल गडेकर यांच्या कुटुंबाला श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली मदतीची चर्चा गावासह पंचक्रोशित केली जातेय. गडेकर कुटुंबाला प्रयणला डॉक्टरांनी सुचवलेली शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. मदतीच्या आशेने हिरालाल गडेकर यांनी बावनकुळे साहेबांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रणयची माहिती बावनकुळे यांना मिळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची तातडीने मदत मिळवून दिली. या मदतीच्या जोरावर प्रणयच्या एका पायाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आता प्रणय एका पायाने का होईना, पण चालण्यास सक्षम झाला आहे.
प्रणय नागपूरच्या मातृसेवा संघ शाळेत आठवीत शिकतो आहे. तिथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत असल्याने गडेकर कुटुंबाला त्याच्या शिक्षणाची चिंता नाही. मात्र, दुसऱ्या पायाची शस्त्रक्रिया झाल्यास मोठा आधार मिळणार आहे. कामठी मतदारसंघात प्रचार दौऱ्यादरम्यान शनिवारी, दि. १६ रोजी गादा गावाच्या भेटीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रणयच्या खांद्यावर हात ठेवत, त्याच्या दुसऱ्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठीही आवश्यक ती पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. गडेकर कुटुंबाने याबद्दल आभार मानले. बावनकुळे साहेबांसारखी माणसं असतील, तर गरीबांची आशा जिवंत राहते. ते आमच्यासाठी देवदूत आहेत.," अशी भावना हिरलाल गडेकर यांनी व्यक्त केली.
• गावात बावनकुळेंच्या मदतीची चर्चा"
श्री बावनकुळे यांनी प्रयणची विचारपूस व त्याची मदत करण्याचे वचन दिल्यावर संपूर्ण गावात प्रशंसा केली जात आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाला आधार देणारी नाही, तर समाजातील उदार नेतृत्वाची प्रचीती देणारी आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या उदारतेमुळे गडेकर कुटुंबाचा संघर्ष आता एका नव्या दिशेने पुढे जात आहे, अशी प्रतिक्रीया गावकऱ्यांनी नोंदविली.