कातलाबोडी ग्राम पंचायतवर महिला राज
★ अनिल देशमुखांच्या पुढाकाराने निवडणुक अविरोध
नागपूर: ( दि. २५ ऑक्टोंबर २०२३ ) काटोल तालुक्यातील कातलाबोडी ग्राम पंचायत अविरोध होण्यासाठी गावातील नागरीक प्रयत्न करीत होते. गावातील सर्वांनीच पुढाकार घेतला. सात सदस्य व सरपंच अश्या आठही जागांवर महिलांनाच उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी पुढाकार घेतला व कातलाबोडी ग्राम पंचायतवर महिला राज विराजमान होणार आहे.
आज नागपूर येथील अनिल देशमुख यांच्या निवास्थानी बिनविरोध निवडुण आलेल्या नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यांच्या सत्कार करण्यात आला. सरंपच पदी सौ अर्चनाताई ललीतजी खोब्रागडे तर सदस्य म्हणुन शिल्पा राहुल इरपाची, अल्का नरेश कोकडे, पल्वी ईश्वर रामगूडे, आशाबाई सुधारक वलके, करिश्मा राहुल भड, संजना सुधारक खंडाते, सुरेखा राम मरकामे या बिनविरोध निवडुण आल्या. ही निवडणुक बिनविरोधत होण्यासाठी धनराज भड, प्रभाकर साठे, नितेश कोवे यांनी पुढाकार घेतला होता. कातलाबोडीची निवडणुक बिनविरोध होवून काटोल तालुक्यात राष्ट्रवादीने आपले खाते उघडले आहे.