बुध्दांचा शांतीचा विचारच जगाला तारणारा आहे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे बँकॉक येथे बुध्दपोर्णिमा उत्सवास प्रारंभ*
बँकॉक/मुंबई दि.2- सम्राट अशोक यांनी कलिंगमध्ये केलेले युध्द अत्यंत घनघोर होते. त्यातुन झालेला रक्तपात आणि मांसाचा चिखल मृत सैनिकांचे हंबरडे फोडुन रडणे हे दृश्य पाहुन सम्राट अशोक यांचे हदय विदीर्ण झाले त्यांना पश्चाताप झाला. ते मनाची शांती शोधु लागले. मन शांतीच्या शोधात असतांना त्यांना बौध्द धम्माचा मार्ग मिळाला. अशा पध्दतीने सम्राट अशोकाचे मन युध्दाकडुन बुध्दाकडे वळले. प्रियदर्शी सम्राट अशोकाने बौध्द धम्माचा प्रसार संपूर्ण भारत आणि जगभर केला.
बुध्दांचा शांतीचा विचारच जगाला तारणारा आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
संयुक्त राष्ट्र संघ (युनो) थायलंड मधील बँकॉकच्या युनोच्या सेंटरमध्ये बुध्दपोर्णिमा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बँकॉक येथील महाचिलाँग कॉर्न राजा युनिव्हर्सिटी येथील सभागृहात या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बौध्द धम्म परिषदेला प्रमुख अतिथी म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले उपस्थित होते
त्यांच्या गगन मलिक फाउंडेशन चे अध्यक्ष गगन मलिक समवेत भीमराव अम्बेडकर कार्यकारी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा,युनायटेड बुध्दीस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, भिमराव सावतकर, नितीन गजभिये हे प्रतिनिधी बॅकॉक येथे बौध्द धम्मपरिषदेला उपस्थित राहिले आहेत.
सद्या रशिया आणि युक्रेन यांचे युध्द सुरु आहे.
युध्दामुळे जगाचे नुकसान होत आहे. युध्दामुळे कोणाचेही कल्याण होणार नाही. बौध्द धम्मामुळेच जगाचे कल्याण होणार आहे. जगाने युध्दाचा नाही तर बुध्दाचा विचार करावा. जगात उद्भभवणा-या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी भगवान बुध्दांनी दिलेल्या शांती, अहिंसा या तत्वांचा पुरस्कार करावा. या विचाराने आपण आंतरराष्ट्रीय बौध्द धम्मपरिषदेला उपस्थित राहिलो असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.
तसेच गगन मलिक फाउंडेशन इंडिया च्या 100 सदस्यना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये नागपुर वरुण सुरेश गायकवाड, वीना गायकवाड, स्मिता वाकडे, मोहन वाकोडे, भीमराव फूसे, आनंद सहारे, दिनेश शेंडे, वर्षा मेश्राम,हैदराबाद प्रसाद, सौसर, अनिरुध दुपारे, पंजाब जलविद्रर सिंग, चंद्रपुर विकास तायडे, बिहार सुमन सौरभ आदि असंख्य अनेक राज्यातिल प्रतिनिधी उपस्थित होते.