हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने बारा जनावराचा मृत्यू
नागपूर : ( २३ सप्टेंबर २०२३ ) नागपूरात शुक्रवारी रात्री झालेल्या सततधार मुसळधार पावसाने हजारी पहाड नाला ओरफ्लो झाल्याने नाल्यातील पाणी शेजारी राहणाऱ्या योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल भोगल यांच्या गायीच्या गोठ्यात शिरल्याने गोठ्यात बांधलेली बारा जनावरांचा मृत्यू झाला.
आज शनिवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी हजारीपहाड (सह्याद्री) भागात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, मायाताई इवनाते, नरेश बरडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. या भागात गोठ्यात बांधलेली बारा जनावरे मृत झाली आहेत. प्रशासनातर्फे तत्काळ आर्थिक मदतीची घोषणा जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी केली आहे. तसेच, ही मदत तत्काळ देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल भोगल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.