चामुंडी येथील दुर्दैवी घेटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा*
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*
मुंबई: ( दि.२९ जुन २०२४ ) नागपूर जवळील धामणा येथील स्फोटके बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात निष्पापांचा जीव गेला. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
श्री. वडेट्टीवार म्हणाले की, सुरक्षा पोशाख, सेफ्टी शूज अशी सुरक्षा साधने कामगारांना उपलब्ध न करून देता त्यांना कंपनीत काम करायला लावले. फटाके बनवणाऱ्या कंपनीत अकुशल कामगार ठेवतात कसे, कामगार अधिकारी काय करतात असा सवाल श्री.वडेट्टीवार यांनी केला. डोंबिवलीमध्ये स्फोटाच्या घटना घडल्या सहा लोकांचा जीव गेला. एक वर्षात असे अनेक अपघात झाले. सरकार मदत देते पण पैशाने जीव परत येत नाही. या भागात असे अनेक कारखाने आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने काही योजना नाही. कामगार विभागाचे लोक फक्त हफ्ता गोळा करायला भेट देतात. तरुण मुले काम करतात. 18 ते 22 वयोगटातील मुलींचा जीव गेला. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी श्री. वेडेट्टीवार यांनी आज विधानसभेतील लक्षवेधीवरील चर्चेवेळी केली.