राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईकडे प्रयाण*
नागपूर दि.24 : राज्यपाल रमेश बैस यांचे दोन दिवसांच्या नागपूर,अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर आज रात्री ९.१० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण झाले.
राज्यपालांना निरोप देण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक(ग्रामीण) विशाल आनंद उपस्थित होते.

आज सकाळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीदान सोहळयात राज्यपाल श्री. बैस सहभागी झाले. त्यानंतर दुपारी त्यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट दिली.