नाट्य कलावंत संजय भाकरे यांची रंगभूमी परीनिरीक्षण मंडळावर नियुक्ती
नागपूर : राज्य सरकारच्या रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळावर नागपुरातून नाट्य कलावंत व दिग्दर्शक संजय भाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. तीन वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय भाकर फाऊंडेशनच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून नवोदित कलावंताना संधी देत आतापर्यंत फाऊंडेशनच्यावतीने ५० एकांकिका सादर करण्यात आल्या आहेत. या एकांकिकेच्या माध्यमातून अनेक कलावंत आज विविध मालिका आणि रंगभूमी क्षेत्रात काम करत आहे. याशिवाय नवोदित कलावंतासाठी नाट्य शिबीर आयोजित केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीचे गेल्या अनेक वर्षापासून पदाधिकारी आहे. सांस्कृतिक आघाडीच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक उपक्रम त्यांनी राबविले आहे. शिक्षक सहकारी बँकेतून सेवानिवृत्त झाल्यावर नाट्यकलेची सेवा करत आहे. राज्य नाटय स्पर्धेत त्यांना अभिनयासह दिग्दर्शकांची पारितोषिक मिळाली आहे. या निवडीबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विदर्भ प्रदेश संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आणि शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके , कुणाल गडेकर यांंच्यासह पक्षातील सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे संजय भाकरे यांनी आभार मानले.