भगवान बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने संविधान चौकात बुद्ध पहाट चे आयोजन
नागपूर: ( दि.५ में २०२३ ) संविधान चौकात बुद्ध पहाट या सुमधर बुद्ध गीतांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम बुद्ध पौर्णिमेच्या निमित्य भरगच्च प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या ८ वर्षापासून मातोश्री महानंदा महिला बहुउदेशिय संस्था नागपूर व सम्यक थिएटर नागपूर याच्या संयुक्त विधमाने “बुद्ध पहाट” चे आयोजन करीत आहे. दरवर्षी बुद्ध जयंतीच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता बुद्ध पहाट चे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा बुध्द पहाटचे आयोजन संविधान चौकात करण्यात आले. सुरुवातीला भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यर्पण करुन व त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळच्या मंगल समयी बुध्द गीतांच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. छायाताई वानखेडे, अहिंसा तिरपुडे,पल्लवी मडके, अश्विन खापर्डे, मिना राव, गौरव जयचित, भोजराज मेश्राम
यांनी एकाहून एक सरस अशी गाणी सादर करुन प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या. संगीत संयोजन भुपेश सवाई यांचे होते व कार्यक्रमाचे सुत्र संचालन अशोक जांभुळकर यांनी केले. तसेच मागील ११ दिवसापासुन संविधान चौकांत सातगाव बुटीबोरी येथील ज्याची घरे तोडली अश्या आदोलंन करीत असलेल्या लोकांना आर्थिक मदतीचे आव्हान करण्यात आले. त्याला उपस्थित बौध्द बाधंवानी उत्सुर्तपणे प्रतिसाद देवून रू १६०००/- ची गोळा झालेली रक्कम आदोलंनकरी यांना सर्वांसमक्ष देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या आययोजनासाठी सम्यक थिएटर नागपूर, युवा ग्रॅज्युएट फोरम, बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई), मातोश्री महानंदा महिला बहुउद्देशीय संस्था, नागपूर व संविधान फाऊंडेशन या संस्थेच्या पदाधिकार्यानी परिश्रम घेतले.