गडकरींचे महामानवाच्या स्मृतींना अभिवादन*
संविधान चौक व दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण*
*नागपूर ( दि. १४ एप्रिल २०२४ ) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चौक व दीक्षाभूमी येथील पुतळ्याला जयंतीनिमित्त माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.*
ना. श्री. गडकरी यांनी सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चौकातील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके आदींची उपस्थिती होती.
त्यानंतर ना. श्री. गडकरी यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यांनी तेथे मा. भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची भेट घेतली. ‘संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित-पीडित समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. त्यांचे कार्य भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे,’ असे ना. श्री. गडकरी यावेळी म्हणाले.