डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचाराला आज पासून सुरुवात
★ महिलांची संख्या लक्षणीय; नागरिकांशी संवाद साधला
नागपूर,( दि. ५ नोन्हेंबर २०२४ )
उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच प्रचाराला प्रारंभ केला आहे. आता मात्र डॉ. राऊत मतदारसंघात फिरुन प्रचार करित आहेत. ही नुसती गर्दी नाही, गाव्ही आहे महाविजयाची, आपला भाऊ-नितीन राऊत, अशा प्रकारची गाणी गात घरोघरी काँग्रेसचे कार्यकर्ते डॉ. राऊत यांचा प्रचार करित आहेत.
दिवाळी नंतर डॉ. राऊत यांच्या प्रचाराने आता पुन्हा एकदा वेग घेतला आहे. उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघात सुरुवातीपासूनच डॉ. राऊत यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारसंघातील घरोघरी भेट देत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. आज सकाळी ब्लॉक क्रमांक १५ मधील मांडवा-सैलानी नगर येथून प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी डॉ. राऊत यानी बिलाल नगर, विश्वभारती नगर, अशरफ नगर, फातमा मस्जिद रोड, प्रिन्स लॉन परिसर, भिलगाव रोड, वांजरा गाव वस्ती मधुन, बम्लेश्वरी नगर, हनुमान मंदिर समोरुन, म्हाडा क्वार्टर, वांजरा झोपडपट्टी पारस कुलर कंपनी समोरून, संयुक्त ले-आऊट, शनिवार बाजार त्रिमुर्ती नगर, पार्वती नगर झोपडपट्टी, न्यु एनर्जी स्कुल, चित्रशाला सरकारी दवाखाना, लाभ लक्ष्मी नगर, नागराज नगर झोपडपट्टी, वाजपेयी नगर परिसर भ्रमण करिता ही पदयात्रा कालीमाता मंदिर परिसरात संपन्न झाली.
दुपारच्या सत्रात शनि मंदिर पासून पदयात्रेला सुरुवात झाली आणि ही यात्रा वृध्द आश्रम-कुलर कंपनी, घाटोले चक्की, न्यू गणेश नगर, श्री गोतमारे यांच्या घरा समोरून, साई मंदिर, बेले नगर, वैभव लक्ष्मी नगर, कामना नगर, ओम साई नगर, प्रभु साई शोरूम समोरून, न्यू ओम साई नगर, गोतमारे लॉनच्या मागून, भवानी नगर, कळमना पोलीस चौकी- म्हाडा क्वार्टर, कळमना वस्तीतून भ्रमण करिता देवतारे लॉन येथे संपन्न झाली.
यावेळी डॉ राऊत यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला. दरम्यान प्रचार पदयात्रेला दिंडीचा स्वरूप मिळालेला होता. अनेक लहान, थोर आणि चिमुरडे वेगवेगळ्या वेशात या पदयात्रेत सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. तर काहींनी 'नुसती गर्दी नाही, गाव्ही आहे महाविजयाची', 'आपला भाऊ-नितीन राऊत' अशा प्रकारची गाणी गाऊन मतदारांना विनंती केली आहे.