राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरुच , वाढता पाठिंबा*
नागपूर : ( दि. १९ सप्टेंबर २०२३ ) संविधान चौकातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला आज १० व्या दिवशी सुध्दा अनेक लोकांनी हजेरी लावली, आज गणेश स्थापना दिवस असतांनाही, समाज बांधवांची , भरगच्च उपस्थिती लक्षणीय ठरली.
आज साखळी उपोषणाला बसणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खालील प्रमाणे, डॉ बबनराव तायवाडे, डॉ विनोद गावंडे,रमेशमामा राऊत, सुभाष घाटे,अविनाश बांगरे,अशोक काकडे,दौलत शास्त्री, भास्कर पांडे, विजया धोटे,सुरेश कोंगे, हेमंत गावंडे,विजय ठाकरे,शकील पटेल, गेमराज गोमासे,केशव शास्त्री, अरुण वराडे, सुषमा भड, मंगला देशमुख, रामभाऊ कावडकर,शेखर सुटे, या कार्यक्रमाचे संचलन अरुण वराडे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शरद वानखेडे, विक्रांत मानकर, परमेश्वर राऊत, नाना झोडे, निलेश कोढे, बाबा, ढोबळे, विनोद इंगोले, श्रीराम काळे, प्रकाश इटनकर , राजेश ढेंगे, श्रीकांत मसमारे , राकेश ईखार, गणेश नाखले, गजानन दांडेकर, नाना सातपुते,यांनी सहकार्य केले याप्रसंगी जेष्ठ संपादक महादेव खैरे उपस्थित होते
ओबीसी बांधवांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे ह्यांनी ह्यावेळी व्यक्त केला.उपस्थितांनी जोरदार घोषणा करुन त्याला पाठिंबा दिला.