विभागीय क्रीडा संकुल येथे उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर उत्साहात सुरू
नागपूर: ( दि. ३ में २०२३ ) उपसंचालक क्रिडा व युवक सेवा नागपूर विभाग नागपूर व जिल्हा क्रिडा अधिकारी नागपूर याचे विद्यमाने, स्टार रेसलिंग एकेडमी नागपूर याचे द्वारा आयोजित उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक याचे हस्ते करण्यात आले.
लहान मुला मुलींना व्यायामाची आवड निर्माण व्हावी व त्या द्वारे सुदृढ समजाची निर्मिती व्हावी तसेच सुदृढ आरोग्यासाठी भारताच्या पारम्पारिक खेळ कुस्ती या खेळाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.अलीकडच्या काळात भारतास ऑलमपिक मधे वयक्तिक खेळ प्रकारात सर्वात जास्त मेडल मिळउन देणारा खेळ म्हणजे कुस्ती.परंतु नागपूर जिल्हात तत्वतः विदर्भात या खेळाला पाहिजे तसा प्रतीसाद न मिळाल्यामुळे या खेळाचा र्हास झाला याची अनेक कारणे आहेत.....
कुस्ती या खेळाला नव संजिवणी मिळावी, कुस्ती नागपूर/ विदर्भात वाढावी म्हणुन स्टार रेसलिंग एकेडमिने क्रिडा विभागाचे सहकार्याने उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.या प्रसंगी २०२० मधे महिला केसरी कुस्ती स्पर्धेत कस्य पदक प्राप्त करणारी नागपूर जिल्ह्यातील पहिली कुस्तीगीर मानधन मिळविणारी महीला पैलवान समिक्षा कोचे हिला ३६०००/रू कुस्ती मानधनाचा चेक देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
या शिबिरात राष्ट्रीय खेळाडू पर्शिता जांभुळकर, अंजली गजभिये, वशिता कोचे,कार्तिक भांडे,यश कोटांगले,आशिष व्हराडे हे खेळाडू सहभागी झाले आहेत. कार्यमाला सौ.संगीता गिरे नगर सेविका श्री दिपक गीरे,अनिल बोरावार क्रिडा अधिकारी,अरुणा गंधे प्रशिक्षक, दर्शना येवतिकर, कार्यक्रमाचे संचलन नीलेश राऊत सचिव स्टार एकेडमी तर प्रास्ताविक दिलीप इटनकर निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी तर आभार डॉ चंद्रशेखर गमे यांनी मानले. हे शिबिर २ महिने चालणार असून ज्या खेळाडूंना प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी संपर्क साधावा. असे आयोजकानी कळवले आहे.