ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी अभिनव अँजिओप्लास्टी
★ वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीसाठी नवीन कॅथेटर केले तयार
नागपूर: ( दि.४ सप्टेंबर २०२४ ) वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर ही काळजी आणि नावीन्यपूर्णतेची परंपरा असलेली एक अग्रगण्य आरोग्य सेवा प्रदाता आहे ज्यामुळे हे हॉस्पिटल मध्य भारतातील रूग्णांसाठी वरदान ठरते. क्रिटिकल रूग्णांवर उपचार करणाऱ्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स मध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी अभिनव अँजिओप्लास्टी तयार करण्यात आली.
हायपरटेन्शन, मधुमेहाने ग्रस्त एक ६८ वर्षीय व्यक्ती (१२ वर्षांपूर्वी झालेल्या) बायपास सर्जरीनंतर छातीत दुखणे आणि हृदयविकाराचा झटका येण्याच्या भीतीने शंकर नगर, नागपूर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आले आणि डॉ. नितीन तिवारी (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) यांनी त्यांचे मूल्यांकन केले. डॉ. नितीन तिवारी (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतर प्रथम अँजिओग्राफी केली.
डॉ. नितीन तिवारी (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) यांनी अँजिओग्राफी रिपोर्टवरून सांगितले की, रूग्णांच्या ग्राफ्टपैकी एक ग्राफ्ट (एलआयएमए ते एलएडी) सुरळीत काम करत होता आणि दुसऱ्या ग्राफ्टमध्ये (एलआरए ते ओएम) ९९% ब्लॉकेज होते. एलआरए ग्राफ्टसाठी त्यांना डीईबी (ड्रग एल्युटिंग बलून) ने इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करावी लागली. परंतु ग्राफ्ट कॅन्युलेट करण्यासाठी विशेष लहान कॅथेटर (८० सेमी लांब) आवश्यक असते. अँजिओप्लास्टीसाठी ठराविक कॅथेटर्स १०० सेमी लांब असतात. आयएमए कॅथेटरचा वापर सामान्यतः बायपास ग्राफ्ट अँजिओप्लास्टीसाठी केला जातो. हे कॅथेटर कुठेच उपलब्ध नव्हते आणि रुग्णाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका होता, त्यामुळे जास्त वेळ थांबणे योग्य नव्हते.
अश्या गंभीर परिस्थितीत डॉ. नितीन तिवारी यांनी एक नवीन कॅथेटर तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका ६ फ्रेंच कॅथेटरचा शाफ्ट आणि दुसऱ्या ७ फ्रेंच कॅथेटरचा हब कापला आणि त्यांना एकत्र करून एक नवीन हायब्रिड कॅथेटर तयार तयार केले गेले. या लहान कॅथेटरचा वापर एलआएमए आणि एलआरए ग्राफ्ट्सला जोडण्यासाठी केला गेला आणि नंतर ड्रग एल्युटिंग बलून फुगवले गेले ज्यामुळे रुग्णाला आराम मिळाला आणि त्याचे प्राण वाचले.
डॉ. नितीन तिवारी म्हणाले की, “गरज ही शोधाची जननी आहे” यात शंका नाही. डॉ. नितीन तिवारी यांनी त्यांचे कॅथलॅब स्टाफ, डॉ. पंकज जैन चौधरी (सीनियर ऍनेस्थेसिस्ट) त्यांच्या उपयुक्त माहितीबद्दल आणि सेंटर हेड श्री रवी बागली यांचे त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले.
श्री रवी बी., सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले, "ही खरोखरच एक आव्हानात्मक केस होती. पण आमच्या डॉक्टरांच्या तज्ज्ञ टीमने ते अगदी अचूकपणे अँजिओप्लास्टी केल्याने रुग्णाचा जीव वाचला. यासाठी आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचे कौतुक करायला हवे. आम्ही आमच्या डॉक्टरांच्या टीमचे आणि सर्व स्टाफचे त्यांच्या योगदानाबद्दल आभारी आहोत ज्यांनी हॉस्पिटलला शिखरावर पोहोचवले आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये, जीवन नेहमीच जिंकते."